१ ) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने उन्नत शेती समृद्धी शेतकरी आणि "कृषी यांत्रिकीकरण उप अभियान" या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी "पलटी नांगर वितरण योजना" सुरू केली आहे. ही योजना केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आहे.
पलटी नांगर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पुढील कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
१) 7/12 आणि 8 अ
२) SC / ST शेतकर्यांसाठी जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत.
३) आधार कार्ड / फोटो ओळखपत्राची साक्षांकित प्रत.
४) बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची एक छायांकित प्रत.
५) विक्रेताचे कोटेशन
६) जर संस्था संस्था असेल तर नोंदणी प्रमाणपत्र
आपल्या क्षेत्रातील खालील सरकारी अधिकाऱ्यांकडून आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल.
* तालुका कृषी अधिकारी
* विभागीय कृषी अधिकारी
* जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी