*ई- पीक पाहणी म्हणजे काय त्याबाबत माहिती घेवूयात..
ई- पिक पाहणी म्हणजे "शेतकरी यांनी स्वतः आपल्या पिकांची माहिती मोबाईल ॲप द्वारे नोंदवणे" शेतकरी यांनी मोबाईल द्वारे नोंदवलेली पीक पाहणी सातबारा उताऱ्यावर दिसणार आहे.
ई पीक पाहणी का करावी?
दुष्काळ अतिवृष्टी,वादळ गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्ती मद्ये शेतपिकांचे नुकसानीच्या भरपाई साठी,पीकविमा योजनेकरीता नुकसान भरपाई साठी,कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी,पी एम किसान योजनेकरीता,तसेच आपल्या जमिनीच्या योग्य मूल्यांकन साठी वस्तुनिष्ठ पीकपाहणी आवश्यक असते.ती शेतकरी यांना स्वतः नोंदविता येईल.
ई- पीक पाहणी मद्ये काय नोंदी घेता येतील
ई पीक पाहणी मद्ये खरीप,रब्बी हंगामाच्या नोंदी घेता येतील.आपल्या शेतातील पिके नोंदी करता येतील.मिश्र पिके पॉलिहाऊस,शेडनेट मधील पिके यांची नोंद घेता येईल.
ई- पिक पाहणी कशी करावी
✒️आपल्या मोबाईल मधील Google Play Store मध्ये "E-Peek Pahani" टाईप करुन ॲप डाऊनलोड करून घ्या.
✒️त्यात दिलेल्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर भरा.
✒️त्या नंतर आपला जिल्हा,तालुका,गाव निवडा.
✒️आता दिलेल्या पर्याय मधून एक निवडून आपले खाते निवडा.
✒️आपण नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संकेतांक (OTP) येईल.तो संकेतांक जपून ठेवा. व त्याठिकाणी भरा.
✒️आता आपल्याला आपला परिचय,पिकांची माहिती भरा,अपलोड,अशी विंडो दिसेल त्यात पिकांची माहिती वर क्लिक करा.
✒️आपला गट नं.निवडून पिकांची माहिती भरा.पिकांचा फोटो काढा. व माहिती साठवा.
अधिक माहितीसाठी जवळच्या तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्य्क, महा इ सेवा केंद्र ,आपले सरकार सेवा केंद्र,ग्रामपंचायत या कार्यालयाशी संपर्क करावा
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻